Home राहुरी पोलीस निरीक्षक ठेंगे यांची गणराज्य न्यूजला भेट

पोलीस निरीक्षक ठेंगे यांची गणराज्य न्यूजला भेट

104
0

राहुरी : पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गणराज्य न्यूज कार्यालयास आज सोमवार 22 रोजी दुपारी सदिच्छा भेट दिली.

    यावेळी गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे यांनी त्यांचे स्वागत करत सन्मान केला.दरम्यान विविध विषयावर चर्चा झाली.गणराज्यची वाटचाल समजून घेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज पर्यंतच्या यशस्वी प्रवासाच कौतुक केल.


     

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं मानवी तस्करीच रॅकेट अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उघडकीस करून  २१ वेठबिगारी व भीक मागणांऱ्याची सुटका केली होती.त्यांच्या या कार्याचा राज्यात सर्वत्र गौरव करण्यात आला होता. राहुरीत वाढलेली गुन्हेगारी कमी करण्याचा सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करू असे मत पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी व्यक्त केले.

  जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

   राहुरी पोलीस ठाण्यात तात्पुरता चार्ज असलेले संजय सोनवणे यांची बदली होऊन त्यांना आश्वि पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. तर बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. नवीन आलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा बेलवंडीचा कारभार चांगल्या कामामुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. मानवी तस्करीचे सर्वात मोठं रॅकेट उघडकीस केल्यामुळे त्यांचा सर्वत्र गवगवा झाला होता. स्नेहालय संस्था, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.

*काय होती मानवी तस्करी*
बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 48 गावं आहेत. पोलिसांना  30 नोव्हेंबर 2022 ला सुरेगाव शिवारात एका पोत्यात बेवारस व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तर ढवळगाव इथे 2023 च्या मे महिन्यात एका विहिरीत अनोळखी अपंग व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नंतर 2023च्या सप्टेंबरमध्येही अशीच घटना घडली. वर्षभर पोलीस या गूढ मृत्यूंचा तपास करत होते. संशयितांच्या चौकशीतून आणि पुरावे हातात आल्यानंतर पोलिसांनी अखेर डिसेंबर 2023 महिन्यात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 18 डिसेंबरला छापे टाकून आरोपींना अटक केली. “2011 पासून या भागात 71 अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले. या भागात एकही औद्योगिक वसाहत नाही, त्यामुळे कामासाठी बाहेरुन येणाऱ्यांची संख्या इतकी कशी याबद्दल संशय बळावत होता.

काही स्थानिकांच्या टोळ्या काही माणसांना डांबून ठेऊन त्यांच्याकडून घरची तसंच शेतीची काम करुन घेतात. अनेकदा त्यांना मारहाणही केली जाते. इतकंच नाही तर या लोकांना वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर भीक मागण्यासाठी पाठवलं जातं. अशा व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात किंवा गोणीत भरुन टाकून देतात.’ याच संदर्भात अशा गुलाम केलेल्या काही जणांना विटभट्ट्यांवर आणि शेतात कामावर ठेवायचे अशा जवळपास २१ पेक्षा जास्त वेठबिगारी व भीक मागणांऱ्याची सुटका पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी करून मानवी तस्करीच रॅकेट उघडकीस केलं होतं.

*गांजा तस्करी, वेश्या व्यवसाय फर्दाफाश*

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील गांजा तस्करी, अवैध वेश्या व्यवसायाचा फर्दाफाश केला होता.

*‘आयजीं’कडून गौरव*
बेलवंडी पोलिस ठाण्याचा कारभार बघत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी  १ मार्च २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत बेलवंडी  पोलीस स्टेशन कडील मालमत्तेविरुद्ध ६१ गुन्ह्यांपैकी ३१ गुन्हे उघडकीस व ६८ आरोपी अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेला १३,५६,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.या कामगिरी मुळे पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर यांचे हस्ते पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे प्रमुख उपस्थितीत बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे कौतुक करून उत्कृष्ट प्रभारी अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.

*चाळीसगावातही  दमदार कामगिरी*पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे चाळीसगाव येथे पोलीस निरीक्षक पदावर असताना अनेक गुन्हेगारी वृत्तीचा त्यांनी बिमोड करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here