गणराज्य न्यूज : राहुरी – भारत देशाच उद्याच भवितव्य असणाऱ्या बालगोपालांप्रति कृतज्ञता व्यक्त करत ब्राम्हणी गावातील स्व.विलास बानकर स्कूलमध्ये शुक्रवारी बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. निरागसतेचा,आनंदाचा व निष्पाप हास्याचा बालदिन साजरा करत चिमुकल्यांना नवी ऊर्जा मिळाली.रंगबिरंगी फुगे व फुले, नयनरम्य रांगोळी, पं.नेहरूंच्या वेशभूषेतील विद्यार्थी अशा आनंददायी वातावरणात कार्यक्रम उत्कृष्ट ठरला.
कार्यक्रमासाठी बालसंस्कार व युवा संस्कार व्याख्याता सौ.वैशालीताई इंगळे, ब्राह्मणी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रा.सुवर्णाताई बानकर,श्री जनार्दन इंगळे, श्री किशोर बानकर,प्राचार्य अश्विनी बानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रारंभी सरस्वती पूजन व पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. दरम्यान सुप्रसिद्ध व्याख्याता सौ.वैशालीताई इंगळे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची अस्मिता व संस्कार टिकविण्यासाठी प्रबोधन केले.
यामध्ये सर्व गुण संपन्न विद्यार्थ्यांची ओळख, ज्येष्ठांचा आदर, मूल्य शिक्षणातून संस्कार नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर सरपंच सौ. सुवर्णाताई बानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी बाल दिनाविषयी उत्कृष्ट भाषणे, गाणे, नृत्य सादर केले.

“लहान वयातच योग्य संस्कार केल्यास मुले मोठी झाल्यावर चारित्र्यवान आणि गुणवान बनतात, तर युवा संस्कारातून तरुणांना योग्य दिशा मिळते, त्यांचे मनोबल वाढते आणि ते समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्षम बनतात असे असे मत प्राचार्य अश्विनी बानकर यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.













