Ganrajya news ब्राम्हणी : नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत असून पंढरी प्रतिष्ठान संचलित स्व.विलास बानकर स्कूल सोमवार 8 जून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती प्राचार्य अश्विनी बानकर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.विद्यार्थ्यांचे औक्षण करून, त्यांना फुल देऊन व फुलांचा वर्षाव करून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे . एलकेजी या वर्गातील चिमुकल्यांची उत्सुकता, पालकांची पूर्वतयारी, नियमित विद्यार्थ्यांना सुट्टीनंतर मिळणारे मित्र यासाठी शाळेचा पहिला दिवस सर्वासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय…
नवीन प्रवेशासाठी विलास बानकर स्कूल सज्ज आहे..
गत आठ दिवसापासून अनेकांनी नवीन प्रवेश घेण्याची कार्यवाही पूर्ण केली. इयत्ता अकरावी सायन्स वर्ग सुरू करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबातील मुला मुलींसाठी अंतराने जवळ व शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा असणाऱ्या बानकर स्कूलमध्ये 11 वी प्रवेश सुरू आहे. विशेषता मुलींच्या सुरक्षेसाठी आपल्याच गावात इयत्ता 11 वी वर्ग सायन्स शाखा सुरू होत असल्याने पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.













