राहुरी : तालुक्यातील वांबोरी परिसरात वादळी वाऱ्याने अवकाळी पावसासह गारांनी जोरात हजेरी लावली.
वांबोरी परिसरातील मोरेवाडी,ससे गांधले वस्ती, कात्रड,परिसरातील गहू,हरभरा,ज्वारी कांदा मका व घास या सारख्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. तरी वांबोरी मंडल कृषी विभागाकडून तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विना विलंब पंचनामे करावे अशी मागणी वांबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी श्री अशोक उत्तमराव पटारे यांनी केली आहे.










