राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावात उद्या शुक्रवार दि.20 मार्च विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व हिंदू बांधवांनी नवीन बाजारतळ येथे सायं 6 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
हिंदू समाजातील एकता व संघटन वाढवण्यासाठी संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याप्रसंगी गुरुवर्य हभप उद्धव महाराज मंडलिक प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान कुटुंब प्रबोधन उत्तर नगर जिल्हा संयोजक प्रसाद बानकर, धर्मजागरण संयोजक सोमनाथ झाडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्र व देशभक्ती जागृत करण्यासाठी संमेलनात विचार ऐकायला मिळणार आहे. विशेष महिला व तरुण मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
कार्यक्रमानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू संमेलन समितीकडून करण्यात येत आहे.










