Home महाराष्ट्र शनिशिंगणापूर ; गावकरी गेट उघडले

शनिशिंगणापूर ; गावकरी गेट उघडले

10
0

गणराज्य न्यूज : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे गावकरी गेट खुले करण्याची मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करीत होते. अखेर शनैश्वर देवस्थानचे प्रशासक व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यास मान्यता दिली. पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत गावकरी गेट खुले करण्यास परवानगी दिली आहे.

यापूर्वी देवस्थान विश्वस्त मंडळाने पहाटे ४ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंत, तर सायंकाळी आरतीच्या वेळेस एक तास गावकरी गेट खुले करण्यास परवानगी दिली होती.

विभागीय आयुक्तांकडे देवस्थानचा कारभार गेल्यानंतर ‘गावकरी गेट’ बंद करण्यात आले. माजी सरपंच बाळासाहेब बानकर व शनिशिंगणापूर ग्रामस्थांनी ‘गावकरी गेट’ खुले करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व शनैश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी चर्चा केल्यानंतर गेट खुले करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना शनिशिंगणापूर येथील ग्रामस्थांनी गावकरी गेट खुले करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी परवानगी दिल्याने आम्ही गावकरी गेट खुले केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here