गणराज्य न्यूज राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्नेहसंमेलने चिमुकल्यांचा उत्साह वाढविणारी तसेच त्यांच्यात लपलेल्या सुप्तगुणांना चालना देणारी आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत या स्नेहसंमेलनाचे आयोजन होत होते. मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अशा कार्यक्रम आयोजनाचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पा. यांनी केले.
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील भटारकरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी रायभान नलगे होते . यावेळी सरपंच शोभाताई लाटे,पद्मश्री विखे पा. कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, विखे पा. कारखान्याचे संचालक बाळासाहेब लाटे, धनंजय आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते व समूह सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित शिक्षण प्रेमी पालक व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला आणखी रंगत आणली. त्यांच्या निवेदनाचं ग्रामस्थांनी विशेष कौतुक केल.
शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा हा स्नेहसंमेलन सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आणि प्रेरणेच्या आठवणी कोरून गेला.
या प्रसंगी काळे पा. विद्यालयाचे मुख्याध्यापक भिमराज चिंधे, स्थानिक स्कुल कमीटीचे अध्यक्ष शंकर लाटे, वि.का. संस्थेचे अध्यक्ष गिताराम पठारे, विलास लाटे, संजय लाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लाटे, उपाध्यक्ष विनोद चोखर, यशवंत लाटे, सुधीर गागरे, मधुकर त्रिभुवन, नितीन वडितके, अविनाश माळी आदिंसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मगरे, उपाध्यापक अंत्रे, श्रीमती वासाल, मरभळ, लखापती, पठारे यांनी परिश्रम घेतले. शेवटी दत्तात्रय लाटे यांनी आभार प्रदर्शन केले.











