Home राहुरी दुर्लक्षित रस्त्याकडे आमदारांचे लक्ष……

दुर्लक्षित रस्त्याकडे आमदारांचे लक्ष……

80
0

राहुरी : तालुक्यातील चंडकापूरमधील हनुमान मंदिर ते डॉ.जरे यांच्या वस्ती पर्यंतच्या दुर्लक्षित रस्त्याच्या खडीकरण कामासाठी 10 ते 12 लाख रुपये मंजूर करून देत असल्याचा विश्वास आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी दिला.

मंगळवार 23 रोजी चंडकापूरमध्ये आमदार तनपुरे यांनी भेट दिली. दरम्यान माजी उपसरपंच वैभव जरे व ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या दुर्दशाबद्दल आमदारांशी चर्चा केली. अनेक दिवसापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगून या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. लागलीच आमदार तनपुरे व ग्रामस्थांनी रस्त्याची पाहणीच केली.प्रत्यक्ष रस्त्याची परिस्थिती पाहून आमदार तनपुरे यांनी दहा ते बारा लाख रुपये मंजूर करून एक किलोमीटर रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावले जाईल.असे आश्वासन दिले.आमदारांनी रस्ता पाहून तात्काळ काम मार्गी लावण्याचा शब्द दिल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सदर रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने दैनंदिन कामासाठी वापर होतो.पावसाळ्यात रस्त्याची बिकट अवस्था होते.आता रस्ता होणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंद वव्यक्त केला जात आहे.

आमदार तनपुरे यांच्या समवेत रस्ता पाहणी करण्यासाठी राजेंद्र आढाव, चंडकापूरचे माजी उपसरपंच वैभव जरे,धोंडीराम आढाव, भीमाशंकर आढाव, रोहिदास जरे, संदीप जरे, आप्पासाहेब हापसे,प्रकाश हापसे, सदाशिव जरे ,शिवाजी आढाव, दीपक माने, अशोक जरे संभाजी हापसे, डॉक्टर लक्ष्मण जरे आदी उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल डॉ.लक्ष्मण जरे व सहकाऱ्यांनी आमदार तनपुरे यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here