ब्राम्हणी: सोमवार २२ जुलै रोजी स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कु. प्रतीक्षा कोरगावकर जिल्हा समिती समन्वयक, भगिनी व सुषमा स्वराज पुरस्कार विजेत्या, लाठी काठी प्रशिक्षक) या उपस्थित होत्या. सर्वप्रथम व्यासपीठावर श्री गुरूंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनानंतर मा. प्रतीक्षा ताई यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे आपल्या जीवनातील स्थान व महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच मुलींना शालेय अभ्यासाबरोबर, सक्षम करण्याकरिता स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी त्यांचा सत्कार केला.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व गुरुजनांचे पुष्पगुच्छ व ग्रीटिंग कार्ड देऊन दर्शन घेतले.शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वातून गुरूंची महती व गाणे सादर केलेत. तसेच विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा दिन यावर उत्कृष्ट निबंध लेखन केले.अशाप्रकारे हा गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस अतिशय आनंदही वातावरणात साजरा करण्यात आला.