सोनई : हिंगोणी येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील भाऊ गडाख यांच्या हस्ते सोमवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पार पडले.
15 ते 22 जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी हरिभक्त परायण सुनीलगीरी महाराज,सिताराम मुळा बँकेची मा. चेअरमन हरिभाऊ झिने, सोसायटीचे चेअरमन शिवाजी सोपान सोनवणे,नानासाहेब नारायण झिने आबासाहेब दगडू सोनवणे, व्हॉ. चेअरमन सोपान सोनवणे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.