अहिल्यानगर
महाराष्ट्र केसरीची लढत पृथ्वीराज मोहोळ व महेंद्र गायकवाड यांच्यात थोड्याच वेळात होत आहे.
महाराष्ट्र केसरी २०२५ ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरूध्द पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली.यामध्ये पृथ्वीराज मोहोळ याने विजय मिळविला. माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरूद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. यामध्ये महेंद्र गायकवाड याने विजय मिळविला. दोन्ही लढतींमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठीचा सामना होणार आहे. तो गादीवर खेळवला जाणार आहे. होणार आहे. गायकवाड व मोहोळ काही वेळेपूर्वी खेळले.त्यामुळे 1 तास विश्रांतीसाठी वेळ दिला आहे.दरम्यान उपस्थित मान्यवरांचे मनोगते झाली.कुस्ती प्रेमी उत्सुकता शिगेला पोहचली असून आजचा महाराष्ट्र केसरी कोण याचा निर्णय थोड्याच वेळात होणार आहे












