ब्राम्हणी : नवीन ग्रामपंचायत चौक व जुन्या बाजार तळावरील बंद सीसीटिव्ही कॅमेरे आज दुरुस्त करण्यात आल्याने ते पुन्हा सुरळीत सुरू झाले.
गत वर्षी ब्राह्मणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यातील काही कॅमेऱ्यांच्या वायरी वाढलेली झाडे,माल वाहतूक ट्रक यामुळे तुटल्या परिणामी कॅमेरे बंद होते. गावच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कॅमेरे सुरु राहणे महत्त्वाच आहे. सदर बाब गणराज्य न्यूजच्या लक्षात येताच ग्रामपंचायतचे लक्ष वेधण्यात आल.लागलीच सरपंच सौ. सुवर्णा सुरेशराव बानकर यांनी दुरुस्तीच्या सूचना दिल्या. ग्राम विकास अधिकारी माणिक घाडगे यांनी तात्काळ कार्यवाही केली. गावातील सीसीटीव्ही कॅमेरा इंजिनियर जालिंदर घाडगे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सदर काम मार्गी लावले.अन् गावातील हालचाल सीसीटीव्ही कॅमेरेत आली.जालिंदर घाडगे यांनी यापूर्वीचे काम केले होते.त्यामुळे सदर काम करताना त्यांना फारसी अडचण आली नाही. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा महत्वपूर्ण ठरत आहेत.