Home महाराष्ट्र यात्रेतील गर्दीचा फायदा घेणारे गजाआड

यात्रेतील गर्दीचा फायदा घेणारे गजाआड

99
0

राहुरी : संत कवी महिपती महाराज यांच्या यात्रेदरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशाने महिलांची व पुरुषांची टोळी यात्रेत आली असल्याची गोपनीय माहिती दि 23 जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मिळाली होती .

सदर माहितीच्या अनुषंगाने शासकीय पंचांसह छापा कारवाई केली असता संगीत सुभाष गायकवाड (वय 45),परिगा नाना राखपसरे (वय 60),सरस्वती दत्तू खंदारे (वय 52) रा.अशोकनगर श्रीरामपूर,मोनिका अशोक चव्हाण (वय 19 ),सहारा प्रशांत चव्हाण (वय 19)
दोन्ही रा. भानस हिवरा ता. नेवासा व असलम अकबर शेख (वय 39) हे दरोडाच्या पूर्वतयारीने मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीयांनी संहिता कलम ३१० अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना मान्य न्यायालयाकडे हजर ठेवून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी अभियंता श्री गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडल्याने पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलिस हवलदार विकास साळवे, विजय नवले ,जानकीराम खेमनर ,अशोक झिने,गणेश मैड , अंकुश भोसले ,नदीम शेख , इफ्तिकार सय्यद, महिला पोलीस शिपाई वंदना पवार ,मीना नाचन श्रीरामपूर आरसीबी पथक चे हवालदार सुनील वाघचौरे व आरसीपी पथक यांनी केली .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व इफ्तेकार सय्यद करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here