ब्राम्हणी : मंगल अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा शुक्रवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता निघणार आहे.तरी सर्व श्रीराम भक्त ग्रामस्थानी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच निमंत्रण म्हणून ब्राम्हणी गावात चार दिवसांपूर्वी मंगल अक्षदा कलश दाखल आहे.
शोभा यात्रेत प्रारंभी –
अश्व
पताका
लेझिम पथक
कलशधारी महिला व मुली
बाल वारकरी
भजनी मंडळ
डफ आणि ढोलिबाजा
अक्षदा कलश रथ
राम सीता लक्ष्मण हनुमान वेशभूषा
अयोध्येला गेलेले कारसेवक
शाळेचे विद्यार्थी
ग्रामस्थ असणार आहेत.तरी या ऐतिहासिक शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेचे प्रस्थान होणार आदिशक्ति जगदंबा माता मंदिर – येडूआई मंदिर – हनुमान चौक – खळवाडी – विठ्ठल मंदिर – हनुमान मंदिर – कालभैरव मंदिर – राम मंदिर येथे सांगता होईल.
अक्षदा कलशातील अक्षदा प्रत्येक वाड्यावस्तीवरील कुटुंबापर्यंत पोहच करून अयोध्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठाचे निमंत्रण अक्षदा कलाशाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा श्रीराम भक्तांचा 1 जानेवारीपासून निर्धार आहे.