Home Blog निवडणुकीनंतर ठरलं पहिलं भूमिपूजन

निवडणुकीनंतर ठरलं पहिलं भूमिपूजन

116
0

 ब्राम्हणी – गावातील तीन अंगणवाडीच्या संरक्षक भिंत बांधकामासाठी 15 व्या वित्त आयोगातून सुमारे साडे सहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. सदर कामाचे भूमिपूजन सरपंच,सदस्य व स्थानिक नागरिकांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी प्रभाकर हापसे,विठ्ठल मोकाटे गुरुजी,वसंत ठुबे,रावसाहेब महाराज गायकवाड,सरपंच सौ. सुवर्णा बानकर उपसरपंच गणेश तारडे,सदस्य महेंद्र तांबे,अरुण बानकर, शांताराम हापसे,गणेश तारडे,राहुल कानडे, अनिल ठूबे,बाबासाहेब गायकवाड,सुभाष तेलोरे, वृद्धेश्वर वैरागर,अर्जुन आंबेडकर, ग्राम विकास अधिकारी माणिक घाडगे आदी उपस्थित होते.

तरोळी वस्ती (2 लाख 30 हजार रुपये) ,मोकाटे-गायकवाड वस्ती (2 लाख रुपये ) व देवीच्या माळावरील अंगणवाडीसाठी 2 लाख 23 हजार रुपये) रक्कम वॉल कंपाऊंडसाठी असल्याची माहिती सरपंच सौ.सुवर्णा सुरेश बानकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here