नगर : पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे देवस्थानच्यावतीने दत्त जयंती उत्सव मंगळवारी उत्साहात पार पडला.बुधवारी कुस्ती हंगामाने यात्रेची सांगता होणार आहे.
दत्त जयंती निमित्त मंगळवारी पहाटे विधिवत अभिषेक पूजा पार पडली. महाआरती, जल अभिषेक व कावड मिरवणूक पार पडली. दुपारच्या सत्रात महाआरती झाली. देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे दिवसभर आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ह.भ.प गंगाधर महाराज गाडेकर यांच कीर्तन झाल. दरम्यान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव पार पडला. परिसरातील महिलांनी पाळण्याची गाणी गायली. रात्री छबिना मिरवणूक व शोभेची दारू पार पडली.त्यानंतर लोकनाट्य तमाशा मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.बुधवार २७ रोजी सायंकाळी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
दत्त जयंती यात्रा उत्सवानिमित्त मंदिरावर व परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिर परिसरातील विविध क्षणचित्रे स्क्रीनच्या माध्यमातून भाविकांना पाहण्यास मिळाले.