Home Blog बानकर स्कूलमध्ये डॉक्टर्स डे

बानकर स्कूलमध्ये डॉक्टर्स डे

2
0

राहुरी : ब्राम्हणीतील स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलकडून राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी गावातील विविध खाजगी हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्राला सदिच्छा भेट दिली.वैद्यकीय कामकाजाची माहिती घेतली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी आकाश घाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

“डॉक्टर्स डे म्हणजे डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेचा, समर्पणाचा आणि मानवतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवाचा दिवस आहे,” असल्याचे प्राचार्य अश्विनी बानकर यांनी सांगून विद्यार्थ्यांना डॉक्टरांचे महत्त्व पटवून दिले.

बानकर स्कूलच्यावतीने डॉ. अंकुश बारगळ,डॉ.बारगळ मॅडम,डॉ.अर्चना पाटोळे, डॉ.आनंद बल्लाळ, डॉ. शितल मोकाटे, आरोग्य सेविका उषा उरुडे व आरोग्य सेवक बाबासाहेब दरेकर आदींचा ग्रीटिंग कार्ड, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉक्टर व आरोग्य सेविकांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टरांविषयी आदर, कृतज्ञता व सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली.

कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here