Home महाराष्ट्र विधिमंडळाकडून सहा वर्षाचे पुरस्कार जाहीर

विधिमंडळाकडून सहा वर्षाचे पुरस्कार जाहीर

49
0

गणराज्य न्यूज गणेश हापसे

मुंबई : विधिमंडळाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यामध्ये नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांना (2018-2019 चा) तर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना (2023-2024 चा) उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.

विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना पुरस्काराला अखेर मुहूर्त मिळाला.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे गत सहा वर्षातील पुरस्कार एकाच वेळी जाहीर करण्यात आले आहे.

लवकरच पुरस्कार वितरण होणारा असून कार्यकाळ संपत असताना पुरस्कार प्राप्त आमदारांच कौतुक होणार आहे.

संबंधित आमदारांना पुरस्कार जाहीर झाल्याचे फोन शनिवारी करण्यात आले. विधानमंडळ कार्यालयातून पत्रही पाठवण्यात आले आहे.

लवकरच सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.2018 -2019 ते 2023 -2024 या 6 वर्षाच्या कार्यकाळातील पुरस्कार आहेत.

२०१८-१९ साठीचे पुरस्कार विधानसभा: उत्कृष्ट संसदपटू – बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप), उत्कृष्ट भाषण: नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप). विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू – डॉ. नीलम गो-हे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप), उत्कृष्ट भाषण : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप)

२०१९-२० विधानसभा: उत्कृष्ट संसदपटू प्रकाश आबिटकर
(शिवसेना), आशिष शेलार (भाजप), उत्कृष्ट भाषण: सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी). विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस). उत्कृष्ट भाषण : रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष)

२०२०-२१ साठीचे पुरस्कार : विधानसभा उत्कृष्ट संसदपटू – अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष), उत्कृष्ट भाषण : प्रताप सरनाईक (शिवसेना), प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी). विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे (शिवसंग्राम). विधान परिषदः उत्कृष्ट भाषण मनीषा कायंदे (शिवसेना), बाळाराम पाटील (शेकाप).

२०२१-२२ : विधानसभा उत्कृष्ट संसदपटू संजय शिरसाट (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप), उत्कृष्ट भाषण सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप). विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (भाजप).
उत्कृष्ट भाषण: गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना), विक्रम काळे (राष्ट्रवादी).

२०२२-२३ साठीचे पुरस्कार : उत्कृष्ट संसदपटू भरत गोगावले (शिवसेना), चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप). उत्कृष्ट भाषण यामिनी जाधव (शिवसेना), अभिमन्यू पवार (भाजप). विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू प्रसाद लाड (भाजप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष). उत्कृष्ट भाषण बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी), प्रद्मा सातव (काँग्रेस).

२०२३-२४ साठीचे पुरस्कार : उत्कृष्ट संसदपटू विधानसभा – रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), राम सातपुते (भाजप). उत्कृष्ट भाषण कुणाल पाटील (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), उत्कृष्ट संसदपटू – विधान परिषद अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप), रमेश पाटील (भाजप). उत्कृष्ट भाषण : आमशा पाडवी (शिवसेना), श्रीकांत भारतीय (भाजप), सुनील शिंदे (शिवसेना).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here