राहुरी : अँकर असोशियनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार गणेश हापसे व जलसंपदा खात्यात कॅनॉल इन्स्पेक्टर या पदावर नियुक्त झाल्याबद्दल नितीन माणिक पटारे यांचा ब्राम्हणी ॲग्रोमाईंड उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ब्राम्हणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्युसर कंपनी व दुध डेअरी, शेतमाल खरेदी विक्री केंद्र,वने पाटील हायटेक नर्सरी,वने पाटील कृषी सेवा केंद्र या उद्योग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष एकनाथ वने, सोमनाथ तारडे, ज्ञानदेव मोकाटे. हरिभाऊ शिरसाठ,सुरेंद्र तेलोरे, आबासाहेब वने, दादा पटारे,वैभव वने,रमेश हापसे,अक्षय वने, फेटा मेकर केतन कानडे,सतीश हापसे, प्रदीप वने,रमेश वने आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच हित जोपासण्याच काम ब्राम्हणी ॲग्रोमाईंडकडून कायम सुरू आहे.ब्राम्हणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्युसर कंपनी व दुध डेअरी, शेतमाल खरेदी विक्री केंद्र,वने पाटील हायटेक नर्सरी,वने पाटील कृषी सेवा केंद्र या उद्योग समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा कायम सन्मान केला जातो.
प्रत्येकाशी आगळवेगळ नातं जपण्याचं काम सर्व संचालक,सभासद करत असून अन्य संस्थापेक्षा एक आदर्शवत कार्य सर्व एकजुटीने करत असल्याचे मत निवेदक संघटनेचे उपाध्यक्ष पत्रकार गणेश हापसे यांनी सत्कार दरम्यान व्यक्त केले.