गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार व 51 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारपासून त्रिदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आज सोमवार दिनांक 11 ते बुधवार दिनांक 13 ऑगस्ट दरम्यान धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते 9 यावेळेत हभप किशोर महाराज गडाख,12 ऑगस्ट रोजी सायंकाळी हभप माऊली महाराज मोरे यांचे किर्तन होणार आहे.मंगळवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हभप सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गरुड व कासव स्थापन सोहळा होईल.
बुधवार सायंकाळी. 7 ते 9 प.पु.हभप प्रकाशनंदगिरीजी महाराज(स्वामीजी)श्री क्षेत्र देवगड यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होवून सोहळ्याची शोभा वाढवावी.ही नम्र विनंती.













