ब्राम्हणी : स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 78 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.
उत्साह पूर्ण वातावरणात विद्यार्थी शाळेत आले. स्वच्छ इस्त्रीचे कपडे, खिशाला तिरंगा ध्वज,विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रांगा,सुबक रांगोळी व फुलांची सजावट अशा नयनरम्य वातावरणात विद्यार्थी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर पंढरीनाथ बानकर, मेजर बहिरनाथ भवार,मेजर श्री. निलेश हापसे,सुधीर कोरके,मेजर अशोकराव ढोकणे आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे परेड पथकाने अतिशय आदरपूर्वक स्वागत केले.दरम्यान मोठ्या अभिमानाने व उत्साही वातावरणात झेंडा वंदन करण्यात आले.
यावेळेस लयबद्ध व तालबद्ध राष्ट्रगीत ध्वजगीत व शिस्तबद्ध परेड,आकर्षक पिटी प्रकार, परेड पथकाची राष्ट्रध्वजाला देण्यात आलेली सलामी कौतुकास्पद ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.अश्विनी प्रकाश बानकर होत्या.
यानंतर देश प्रेमाने भारावलेल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण भाषणे, गीते सादर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
यानंतर शाळेतील विविध स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. व यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.