गणराज्य न्यूज ब्राम्हणी – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट प्राथमिक कृषी सहकारी संस्थेमार्फत ब्राम्हणी सहकारी सोसायटीस नवीन गोदाम (वेअर हाऊस) व जुने गोदाम दुरुस्तीसाठी 90 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती संस्थेचे सचिव अशोक आजबे यांनी सर्वसाधारण सभेत सभासदांना दिली.
संस्थेचे चेअरमन महेंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मणी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली.
नवीन गोदाम बांधणे व जुने गोदाम दुरुस्त करणे यासाठी एकूण सुमारे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये 90 रुपये अनुदान, 30 लाख रुपये रिझर्व फंडातून तर 31 लाख रुपये बँक कर्ज मिळणार आहे. सदर योजनेत नवीन गोदामासाठी अनुदान मिळवणारी ब्राह्मणी सोसायटी तालुक्यात पहिली ठरली आहे.
संस्थेचे एकूण 1 हजार 833 सभासद आहेत. शेअर भाग भांडवल 2 कोटी 24 लाख इतके आहे. सभासदांना 12 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.आदीसह संस्थेची विविध माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक बाळकृष्ण बानकर, संचालक सुरेश बानकर, बाळासाहेब देशमुख, शिवाजी राजदेव,दादासाहेब हापसे,अनिल ठुबे,डॉ.राजेंद्र बानकर,अशोक नगरे, श्रीकृष्ण तेलोरे,अरुण बानकर आदीसह सभासद विजय बानकर,प्रभाकर हापसे,जालिंदर हापसे, प्रशांत शिंदे,भानू आप्पा मोकाटे,शांताराम हापसे,पत्रकार गणेश हापसे आदींनी चर्चेत भाग घेतला.माणिक तारडे,डॉ. नंदकुमार बल्लाळ,ठकसेन बानकर आदीसह संस्थेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते. संस्था व सभासद हितासाठी आम्ही कायम सोबत आहोत.असे मत विरोधी संचालकांनी व्यक्त केले.तर,संस्थेच्या कल्याणासाठी सर्वांची मते जाणून घेत काम केलं जातं असल्याचा विश्वास सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केला. संचालक सभासदांचे प्रश्न विचारत घेवून त्यावर सकारात्मक उत्तरे देत सभा खेळीमेळीत पार पडली.













