गणराज्य न्यूज ब्राम्हणी : ग्रामपंचायत उपसरपंच गणेश तारडे यांनी आपल्या पदाचा पदाचा राजीनामा दिला आहे.
ठरल्याप्रमाणे रोटेशननुसार कालावधी पूर्ण झाला.आठ दिवसापूर्वी राजीनामा सादर केला होता. गुरुवारी मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला. नवीन उपसरपंच पदासाठी विरोधी त्या तीन सदस्यांमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. विरोधी गटाच्या सर्वाधिक जागा असल्याने उपसरपंच त्यांचाच होणार हे निश्चित आहे.तरी,गत निवडीप्रमाणे सत्ताधारी गटाचा सदस्य अर्ज दाखल करणार की निवडणूक बिनविरोध होणार याकडे गावाचे लक्ष लागून आहे.
गत आठ महिन्यापासून गणेश तरडे यांनी उपसरपंच पदाच्या माध्यमातून आपल कर्तव्य पार पाडले. ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबविण्यात येणारी वीज उपक्रम कामे यास त्यांनी पुरेसा वेळ दिला.
गावाच्या विविध प्रश्नसह आपल्या प्रभागातही लक्ष दिले. सरपंच व सर्व सदस्याशी समन्वय साधला.
- आता नवीन उपसरपंचपदाची निवड झाल्यावरही माजी उपसरपंच व सदस्य या नात्याने तेवढाच वेळ आपण पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतला वेळ द्यावा. आपल्या अनुभवाचा फायदा होईल.हे निश्चित….