Home महाराष्ट्र प्रशासन गतिमान

प्रशासन गतिमान

73
0

राहुरी : महायुती सरकारकडून महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.जनतेच्या कामे करण्यासाठी अशा शिबिराचे पुन्हा नियोजन करू.असे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार ब्राम्हणी येथे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार
योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना आंदींचा लाभ देण्यात आला. तसेच या अभियानांतर्गत सात-बारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनासाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्यात आले.

जिल्हाधिकारी पंकज आशिया,
प्रातांधिकारी किरण सावंत, तहसिलदार नामदेव पाटील यांनी तालुक्यातील अनेक ठिकाणी भेटी देऊन शिबिराचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here