Home महाराष्ट्र भर दुपारी मारहाण अन् मृत्यू

भर दुपारी मारहाण अन् मृत्यू

30
0

राहुरी –  सोनई – शनिशिंगणापूर फाटा येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान मायलेेकाने केलेल्या मारहाणीत एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

शनिशिंगणापूर फाटा येथे दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गर्जे, वय ६८ वर्ष, रा. अकोला जिल्हा अहमदनगर, या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करीत होते. तरुणाने सुखदेव गर्जे यांना हेल्मेटने मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे हे खाली पडले आणि जागेवर गतप्राण झाले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारा पुर्वीच मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदि पोलिस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलिस पथकाने ताबडतोब एक महिला व तीच्या मुलाला ताब्यात घेतले. वैभव विष्णू फुंदे, वय २४ वर्षे व सावित्री विष्णू फुंदे, रा. विद्यापीठ, मुळ रा. पाथर्डी, असे ताब्यात घेतलेल्या तरुण व महिलेचे नाव असल्याचे समजले.

१५ दिवसां पूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सोन्याचे दागीने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. सदर घटना ताजी असतानाच आज मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला कि इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास राहुरी पोलिस पथकाकडून सुरु आहे. मात्र सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याची परिसरात चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here