राहुरी – तालुक्यातील ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड संचलित दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादक सभासदांना दिवाळीनिमित्त प्रति 5 किलो साखर वाटप करण्यात आली.
गत दोन वर्षापासून ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्यूसर कंपनी संचलित दूध डेअरी सुरू आहे.16 लिटर पासून झालेली सुरुवात आज सुमारे सहाशे लिटर दूध संकलनापर्यंत येवून ठेपली. दूध उत्पादकांचा विश्वास संपादन करत शेतकरी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर कंपनी परिसरात आघाडीवर आहे. तज्ञ व्यक्तीं व कंपनीस निमंत्रित करून पशुपालक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावे राबविले जाते.
कृषी क्षेत्राचा मुख्य जोड व्यवसाय पशुपालन आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पशुपालना संदर्भात योग्य ते गाईडलाईन ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून केले जात असल्याची माहिती अध्यक्ष भाऊराव वने यांनी दिली.
कृषी क्रांती शेतकरी गट ते ब्राह्मणी ॲग्रोमाईंड फार्मर प्रोड्यूसर कंपनी अशी वाटचाल करण्यात टीम यशस्वी झाली. सर्व संचालक मंडळ व सभासदांचा समन्वय एकीच बळ या गोष्टीमुळे सर्व शक्य असल्याचे वने यांनी सांगितले.













