ब्राम्हणी : गणेश उत्सवानिमित्त बहिरोबा प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम शुक्रवार रात्री 8 ते 11 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रसिद्ध निवेदक गणेश हापसे भाऊजी ब्राम्हणीकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. महिलांसाठी सासर- माहेर, पाणी बॉटल बॅलन्स, फुगे फोडणे, रुमाल उचलने आदीसह विविध खेळ घेण्यात आले. स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वतःहून सहभागी होत महिलांनी खेळाचा आनंद लुटला. लहान मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला, ज्येष्ठ महिलांनी देवीच्या गाण्यावर ठेका धरत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यान महिलांना विविध प्रश्न विचारात आले. त्याचे उत्तरे देण्याचा महिलांनी प्रयत्न केला….श्रीमती. कांता विठ्ठल हापसे,सौ.शारदा बाप्पुसाहेब हापसे,सौ.सविता विजय तेलोरे,जया विजय साठे, सौ.वैशाली पांडुरंग हापसे,सौ. सोनाली भारत डोळस,सौ.चंद्रकला बहिरणाथ भावर,सौ.जोती दीपक पाटोळे,सौ.उज्वला आदिनाथ हापसे,सौ. निषा बाबासाहेब हापसे,सौ.मिना रामभाऊ पटारे आदी सहभागी स्पर्धकांनी विविध खेळात भाग घेऊन अंतिम स्पर्धेपर्यंत गुण मिळविले. यामधील सहा महिलांना साडी तर, अन्य महिलांना गृह उपयोगी वस्तू भेट देण्यात आली.
विविध स्पर्धेसाठी लागणारे बक्षीस व साहित्य गौरव विठ्ठल हापसे, मेजर बहिरणात संपत भवार,आदिनाथ नारायण हापसे, रामभाऊ यामाजी पटारे, विलास सकाहारी भवार,संजय यमाजी पटारे,नितीन चांगदेव हापसे,संजय बाळासाहेब जाधव,बाबासाहेब सर्जराव हापसे,समाधान भाऊसाहेब साठे,सुनील मच्छिंद्र गायकवाड आदींनी बक्षिसे देऊन कार्यक्रम घडवून आणला. महिलांना साड्या बक्षीसे देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहिरोबा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.