गणराज्य न्यूज राहुरी : ब्राम्हणीतील तरुण चि.रविंद्र बाबासाहेब नगरे यांची कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील Telus International मध्ये QA इंजिनियर म्हणून निवड झाली.या निवडीबद्दल रविद्र यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रवींद्र इयत्ता सहावीत असताना वडील बाबासाहेब यांचे निधन झाले.चुलते अशोक नगरे यांनी त्यांची दोन मुले व दोन मुली यांना पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण दिले त्याचप्रमाणे रवींद्रला देखील मुलगा समजून आयटी इंजिनियर केले. त्याने देखील या संधीचे सोने करून आयटी क्षेत्रात नाव उज्वल करून अल्पावधीतच बेंगलोर पर्यंत मजल मारली.
नगरे कुटुंब तसे शून्यातून उभे राहिलेले. आजोबा गजराम नगरे यांच्यापासून हा परिवार श्री राजा वीरभद्र देवाच्या सेवेत आहे. आजही चौथ्या पिढीत रवींद्र हाच उंबरे येथे श्री राजा वीरभद्र मंदिरात विजयादशमीच्या दिवशी व्हाईक सांगतो.अशोक नगरे डॉ. तनपुरे सहकारी कारखान्यात अनेक वर्ष सेवेत होते.कामगार संघटनेचे त्यांनी नेतृत्व केल.
आज गावासह परिसरात राजकीय,सामाजिक आदीसह विविध क्षेत्रात व धार्मिक कार्यात सहभागी आहे.सध्या ब्राम्हणी सोसायटीच्या संचालकपदावर कार्यरत आहेत. रविंद्र यांची आई व चुलती लेडीज टेलर व ब्युटी पार्लर आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत.पूर्ण नगरे परिवार संघर्षातून पुढे आला.परिस्थितीची जाणीव ठेवून कायम कामात व्यस्त राहत आपलं कुटुंब आज परिपूर्ण करण्यात अशोक नगरे यशस्वी ठरले आहे.













