ब्राम्हणी – वांबोरी रस्त्यावरील ससे गांधले वस्ती येथे संत सेवाधाम वारकरी गुरुकुलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 1 मे ते सोमवार 5 मे दरम्यान भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संत सेवाधामचे प्रमुख हभप किशोर महाराज गडाख यांनी दिली.
पाच दिवसाच्या कालावधीत ह.भ.प भागवत महाराज जंगले शास्त्री, हिंदू धर्मप्रचारक पांडुरंग शास्त्री शितोळे,समाजप्रबोधकार चंद्रकांत महाराज खळेकर, हिंदूधर्मभूषण संग्रामबापू भंडारे व गुरुवर्य जंगली महाराज शास्त्री आदींची सायं 7 ते 9 यावेळेत किर्तन होणार आहेत.20 एप्रिल पासून संत सेवाधाममध्ये बालसंस्कार शिबिर आहे.यामध्ये मुलांना विविध प्रकारची आध्यात्मिक शिक्षण दिले जात आहे.वर्षभर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण दिले जात आहे. प्रार्थना हरिपाठ, पाऊली, मृदंग वादन विना वादन, हार्मोनियम, टाळ वादन, प्रवचन व कीर्तन आदी विषय बाल वारकऱ्यांना शिकविले जात आहे.
















