ब्राम्हणी – महाराष्ट्र राज्य, जलसंपदा विभाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत टप्पा क्रमांक एक मधील मुळा प्रकल्पांतर्गत मुळा उजवा कालवा व वितरण व्यवस्था कामांची दुरुस्ती करणे या कामाचा भव्य शुभारंभ जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता ब्राम्हणी (ता. राहुरी) येथे होणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आ.शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यासह नेवासा पाथर्डी व शेवगाव या भागाला मुळा उजव्या कालव्याचा लाभ होतो. गेल्या अनेक वर्षांपासून सदर कालव्यांची दुरुस्ती होणे गरजेचे बनले होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सदर कामासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या कामाचा शुभारंभ होत असल्याने लाभधारक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मुळा प्रकल्पांतर्गत मुळा उजवा कालवा वितरण व्यवस्था कामांची दुरुस्ती करणे या कामाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी आ.मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील, राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून राहुरी नेवासा पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.कर्डिले यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन इमारतीचा समारंभ देखील रविवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता राहुरी येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत असून यावेळी देखील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ.कर्डिले यांनी केले आहे.















