Home राहुरी यशवंत पाणी वापर संस्थेचा निवडणूक निकाल जाहीर

यशवंत पाणी वापर संस्थेचा निवडणूक निकाल जाहीर

100
0

गणराज्य न्यूज सोनई : नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील यशवंत पाणी वापर संस्थेच्या  12 जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी यशवंत मंडळाला सर्वाधिक 8 तर, विरोधी व विरभद्र मंडळाला 4 जागा मिळाल्या.

रविवार 3 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडले.4.30 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला.6 वाजता मतमोजणी पूर्ण होवून निकाल घोषित करण्यात आला.

विजयी उमेदवारांची नावे व (मतदान) पुढील प्रमाणे यशवंत शेतकरी सहकारी मंडळाकडून किरण सुदाम दराडे (८३), गणेश महादेव दराडे (७५) सीमा अशोक दराडे (७५) गोरक्षनाथ विठ्ठल वने (७९) दिनकर कुंडलिक बानकर (९५) सखाराम रंगनाथ शिंदे (९०),अलका बाळासाहेब जामदार (९१) सुलोचना सुदाम बानकर (४०)

तर विरोधी वीरभद्र शेतकरी विकास मंडळाकडून सुनील लक्ष्मण पालवे (७४) जयसिंग मिठ्ठू दराडे (५०) प्रभाकर जगन्नाथ बानकर (४८) तय्यब साहेबलाल इनामदार (४५) हे विजयी झाले.

कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास पाटील तर, सहाय्यक म्हणून बी. व्हि घोरपडे यांनी काम पाहिले.

यशवंत मंडळाचे नेतृत्व महादेव दराडे, सुदाम बानकर यांनी तर विरोधी वीरभद्र मंडळाचा नेतृत्व जयसिंग दराडे,राजू दराडे यांनी केले.

यशवंत पाणी वापर संस्थेची आज अखेर ही तिसरी निवडणूक आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली. परिणामी यंदाची निवडणूक अटीतटीची व चुरशीची ठरली. वंजारवाडीच्या यशवंत पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीकडे नेवासा,राहुरी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून होते.अखेर सत्ताधारी यशवंत मंडळाला पुन्हा यशवंत पाणी वापर संस्थेची सत्ता राखण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here