राहुरी – सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट काम केल्याने नुकसान झाले याच्या निषेधार्थ शनिवार दि.31 ऑगस्ट रोजी राहुरी मार्केट कमिटी समोर सकाळी 9 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आमदार प्राजक्त दादा तनपुरे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
उपोषण स्थळी सकाळी ११ वा शिवचरीत्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ४ वा शिवव्याख्याते हसन सय्यद यांचे व्याख्यान होणार आहे.तरी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात येत आहे.