Home Blog ते 2 प्रश्न तात्काळ मार्गी लावा – ग्रामस्थांची मागणी

ते 2 प्रश्न तात्काळ मार्गी लावा – ग्रामस्थांची मागणी

119
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;

ब्राह्मणी : गावात काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. एवढी मोठी कुत्र्यांची संख्या पाहता नेमकी एवढे अचानक टोळक्याची टोळके मोकाट कुत्रे कुठून आलेत. असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तरी, सदर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

याशिवाय ब्राह्मणी बस स्टँड परिसरात तयार केलेले यापूर्वीचे रबरी निकृष्ट दर्जाचे गतिरोधक निघून गेल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. ब्राह्मणी बस स्टँड परिसरातील रस्ता उताराचा आहे. शिर्डी शनिशिंगणापूर चालणारे वाहने, मालवाहतूक वाहने भरधाव वेगाने धावतात…. यापूर्वी किरकोळ अपघाताची असंख्य प्रकार घडले. त्यात मोकाट कुत्री बस स्टँड परिसरात रस्त्यावर झोपतात उभे राहतात अचानक आडवे येतात. जोराची धडक बसल्यास यातून एखाद्या प्रवाशाचा मृत्यू होऊ शकतो. भविष्याचा विचार करता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व  गतिरोधक कायमस्वरूप टिकाऊ व डांबरीच पक्के व्यवस्थित करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here