राहुरी – तालुक्यातील उंबरे येथील विश्वमाउली आध्यात्मिक गुरुकुल मध्ये तृतीय वर्धापन दिनानिमित्त ९ मे पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन विश्वमाउलीचे प्रमुख आदिनाथ महाराज दुशिंग यांनी केले आहे.
शुक्रवार ९ ते मंगळवार १३ मे दरम्यान होत असलेल्या हरिनाम सप्ताहात रामेश्वर महाराज राऊत, भाषाप्रभू अमृतजी महाराज जोशी, वारकरी भूषण युवराज महाराज देशमुख, शांतीब्रम्ह योगीराज महाराज गोसावी आदींची दररोज रात्री ७ ते ९ यावेळेत किर्तन होणार आहेत. १३ मे रोजी महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.















