
ब्राम्हणी : गावातील प्रभाग क्रमांक 2 मधील आरोग्य उपकेंद्र ते सर्जेराव वाकडे यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी पंचायत समितीची शाखा अभियंता अशोक पाटील यांनी केली.
सुमारे सव्वाशे मीटर लांबी व चार लाख रुपये किंमतीच सदर काम आहे. गावातील यापूर्वी झालेल्या अन्य कामाच्या तुने सदर काम व्यवस्थित उत्कृष्ट व्हाव. यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पाटील यांनी ठेकेदार बाळासाहेब शिंदे यांना दिल्या.
ब्राह्मणी गावात यापूर्वी अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामे झाली. सध्याची परिस्थिती पाहता ती टिकली नसल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी काम करतानाच आता अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.












