गणराज्य न्यूज
नेवासा
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर-मनमाड या मार्गावरील बाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. तरी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कांगोणी ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ कराळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कराळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर मार्ग आणि अहिल्यानगर-मनमाड मार्ग या दोन्ही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पायी चालणेही कठीण झाले आहे. मोठ्या वाहनांना मार्ग काढणे अवघड झाले असून रोजचे अपघात सुरुच आहेत. नगर-मनमाड हायवेवरील वाहतूक छत्रपती संभाजीनगरमार्गे वळविण्यात आल्याने या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघातांची
मालिका सुरू असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. कराळे यांनी वाहतूक बंद करा व रस्त्याच्या खड्ड्याची डागडूजी करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला आहे.













