गणराज्य न्यूज
वेब टीम राहुरी
श्री मोटर्स ऑटो दुकानात रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी प्रवेश करत मोटरसायकलचे टायर व पार्ट्स खोलून लंपास केले.

राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौक येथील रवी कदम यांच्या श्री. मोटर्स येथील दुकानात काल रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे
यावेळी घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी भेट देत पोलिसांना तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या राहुरी फॅक्टरीत महिनाभरापासून चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून आठवडे बाजारात दर रविवारी एक मोटारसायकल चोरी जात असून गाड्यांचे टायरे देखील चोरटे लंपास करत आहेत.
घटनास्थळी राहुरी पोलीस दाखल होत पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चौकट
परिसरात होत असलेल्या चोरीच्या घटना तातडीने उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भाजपा राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम यांनी दिला आहे.













