राहुरी : तालुक्यातील क्षेत्र ब्राम्हणी गावात श्री क्षेत्रपाल कालभैरव जन्मोत्सव सोहळ्याचे आज बुधवार 12 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आहे.तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

दोन दिवसीय कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता,आकर्षक विद्युत रोषणाई, उत्कृष्ट डेकोरेशन करण्यात आले आहे.आज सकाळी जलाभिषेक,रात्री संगीत भजन व मध्यरात्री 12 वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.तसेच गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी सकाळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आयोजित भैरव यज्ञ होणार आहे. सायं 4 ते 7 जागरण गोंधळ व त्यानंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद होईल. तरी आपण सर्वांनी सोहळ्यात सहभागी व्हावे…असे आवाहन करण्यात येत आहे.













