सोनई – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा ट्रस्टच्या वतीने अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख,पत्रकार विनायक दरंदले, पंढरीनाथ महाराज तांदळे व उद्योजक सुदाम तागड यांना प्रमुख मान्यवर व विश्वस्तांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
ज्ञानगंगा विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष शाळिग्राम होडगर, निवृत्ती महाराज मतकर व मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते खासदार वाकचौरे,गडाख, तांदळे महाराज, पत्रकार दरंदले व उद्योजक तागड यांचा शाल,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण बारगळ, उपाध्यक्ष पाराजी कोल्हे, विश्वस्त संतोष आदमाने,शशीकांत भुसारी यांनी स्वागत केले. विश्वस्त राधाकिसन भुसारी,जगन्नाथ बारगळ,विष्णु पोंधे,मारुती राशिनकर, भानुदास गवळी व बाळासाहेब ढाले यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
अहिल्यादेवी ट्रस्टचे सचिव शहादू राशिनकर यांनी प्रास्ताविक केले. फाॅरेस्ट ऑफिसर अश्विनी तागड यांनी एमपीएससी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विश्वासराव गडाख यांनी सुचना मांडल्याने खासदार वाकचौरे यांनी तुळजाभवानी मंदीर व शिंगणापूर रस्त्यावरील बालाजी मंदीराच्या सभामंडपास प्रत्येकी पाच लाखाचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. होडगर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
संत निरंकारी सोनई शाखेचे मुखी विठ्ठल महाराज खाडे,ओमशांती केंद्राच्या प्रमुख उषादिदी, उद्योजक शिवाजी बाफणा, आप्पासाहेब निमसे,डाॅ.शिरसाठ, डाॅ.रामनाथ बडे उपस्थित होते. गणेश हापसे यांनी सुत्रसंचालन केले. सखाराम राशिनकर यांनी आभार मानले.
————————————-