Home राहुरी एकापाठोपाठ दोन दुःखाचा डोंगर

एकापाठोपाठ दोन दुःखाचा डोंगर

121
0

ब्राम्हणी : वर्ष श्राद्धाच्या दिवशी आई पाठोपाठ दिराचे निधन….जामदार परिवारावर दुःखात दुःख…..एका पाठोपाठ एकाच दिवशी दोन दुःखद घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

स्व.हिराबाई दत्तात्रय जामदार यांचे काल गुरुवार 8 रोजी वर्षश्राद्ध होते.दरम्यान सकाळी स्व. हिराबाई यांची आई शांताबाई कापसे (भगवती कोल्हार) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. एकीकडे लेकीच श्राद्ध अन् दुसरीकडे आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती.

वर्ष श्राद्ध कार्यक्रमामुळे जामदार परिवाराला कालच्या दिवशी कोल्हारला जाणे अशक्य होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सावडण्याच्या विधीला जाण्याची तयारी असतानाच गुरुवार 8 रोजीच रात्री पावणे आकरा दरम्यान स्व. हिराबाई दत्तात्रेय जामदार यांचे दिर ॲड.प्रकाश लक्ष्मण जामदार यांचे निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार 9/02/2024 रोजी सकाळी 9 वाजता देवीचे तळे ब्राम्हणी येथे होणार आहे.दत्तात्रय जामदार यांचे ते लहान भाऊ होते.तर,सचिन व निलेश यांचे ते वडील होते. प्रवीण व प्रदीप यांचे ते चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, भाऊ, पुतणी,पुतणे सुना नातवंड असा परिवार आहे.

ब्राम्हणी गावात जामदार परिवाराच दोन भावाचे एकच कुटुंब.. अत्यंत शांतता प्रिय व सोज्वळ स्वभावच कुटुंब म्हणून जामदार परिवाराची परिसरात ओळख….पण याच कुटुंबावर एकापाठोपाठ दुःखाचा डोंगर कोसळल्याने ग्रामस्थ नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here