ब्राम्हणी : आईचे निधन होवून उद्या शुक्रवारी तीन महिने पूर्ण होत असताना आज मुलाचे निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली.
स्व.पुष्पा जनार्दन हापसे यांचा उद्या शुक्रवारी तिसरा महिना आहे. दरम्यान आज मुुलगा प्रकाश जनार्दन हापसे (वय ४६ ) यांचे रात्री निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दुपारी दिड ते दोन वाजेच्या दरम्यान देवीच्या तळ्यावर होणार आहे.
हापसे परिवारात पाच दिवसाच्या दरम्यान दुसरी दुःखत घटना घडली.यापूर्वी प्रकाश हापसे यांच्या नात्याने पणजी असणाऱ्या चंद्रभागा हरी हापसे यांचे 18 रोजी निधन झाले होते.त्यांना जावून पाच दिवस पूर्ण होत नाही तोच आज त्याच परिवारात दुसरी दुःखत घटना घडली.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,दोन मुलगी,भाऊ असा परिवार आहे.पोलीस पाटील जालिंदर रखमाजी हापसे यांचे ते पुतणे होते.तर,बाबुराव हापसे ते भाऊ तर,डॉ.तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी संचालक माणिकराव तारडे यांचे ते जावई होते.