राहुरी : तालुक्यातील मोकळ ओहळ येथील चेडगाव रस्त्यावरील लहारे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तीन दिवसांत बिबट्याशी संबंधित गंभीर घटना घडल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.
दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता रवी गायकवाड हे डेअरीला दूध घालण्यासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने झडप मारली. गाडी पडल्याचा आवाज होताच बिबट्या तिथून पसार झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली
नाही. त्यानंतर दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी किशोर लहारे हे त्यांच्या शेतात चारा काढत असताना बिबट्याचे दर्शन झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेतली. त्यानंतर घराच्या छतावरून त्यांनी कॅमेऱ्यातून बिबट्याचा छायाचित्र टिपले. तसेच दि. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी
जयराम औटी यांच्या मक्याच्या शेतात बिबट्या ठाण मांडून बसलेला आढळून आला. त्याला हुसकावण्यासाठी फटाके वाजवण्यात आले, मात्र तो जागेवरून हलला नाही.
या घटनांची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी रामचंद्र अडगळे यांच्याशी आला. संपर्क त्यांनी साधण्यात तात्काळ
घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावला. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे व बिबट्याची दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बिबट्याचा वावर लक्षात घेता शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनला आहे. याबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांना सूचना देत, विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना पालकांनी स्वतः सुरक्षितरीत्या ने-आण करावी, असे आवाहन विवेक गारकर, अशोकराव पटारे, दत्ता कदम, गणेश गायकवाड, जालिंदर लहारे व बाबु तोडमल या शेतकऱ्यांनी केले आहे.














