Home अहमदनगर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

86
0

 

गणराज्य न्यूज टीम दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम

इंडियाला विजयासाठी २६५ धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान ४८.१ षटकांमध्ये ६ बळी गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने २६७ धावा केल्या. विराट कोहली हा या विजयाचा नायक ठरला. तसेच श्रेयस अय्वरसह इतरांनीही विजयात निर्णायक योगदान दिलं. टीम इंडियाचा हा या

स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह २०२३ वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा वचपाही घेतला. ऑस्ट्रेलियाने २६५ धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाला ५० धावांच्या आत २ मोठे झटके दिले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here