नगर : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीच्या मुक्ताईनगरमधील विश्व शांती सेवा भावी संचलित महात्मा फुले बाल गृह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार निलेश लंके यांची भेट घेवून संस्थे संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले.
वर्षभर संस्थेच्या माध्यमातून गोर-गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्था करत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विजय मोहन सावंत यांनी खासदार निलेश लंके यांना दिली.
दरम्यान संस्थेच्या कार्याचे खासदार निलेश लंके यांनी कौतुक केले. लवकरच राहुरी तालुक्यातील दौऱ्यावेळी निश्चितच संस्थेच्या भेटीसाठी येणार असल्याचे आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिले. संस्थेला आमच्याकडून कायम सहकार्य राहील. असा विश्वास यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय मोहन सावंत,खजिनदार कैलास तुकाराम बाबर,सचिव विजय सूर्यभान गायकवाड,संदीप शिवाजी शिंदे,अजय मोहन सावंत,किरण भिमराव शिंदे, सागर अभिमान माळवे,मोहन भिमराव सावंत,अभिषेक सावंत आदी उपस्थित होते.