ब्राम्हणी : त्रिंबक उत्तम मोकाटे (वय ६०) यांचे आज 19 रोजी पहाटे 4.30 वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी देवीच्या तळ्यावर आज सकाळी 10 वाजता होणार आहे.
गावात त्यांची ओळख सरकार या नावाने होती.अनेक ग्रामसभेत निर्भिड,निपक्ष प्रश्न उपस्थित करत गावचे विविध प्रश्न ते मांडत. क्रिकेट खेळाची त्यांना विशेष आवड होती.अनेक दिवस त्यांनी क्रिकेटच्या विविध स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले .
त्यांच्या पश्चात पत्नी,एक,मुलगा,एक मुलगी,पाच भाऊ असा परिवार आहे.विठ्ठल,भानुदास,रामदास,रंगनाथ,प्रेमसुख मोकाटे यांचे ते बंधू होते.तर,अजित मोकाटे यांचे ते वडील होते.