ब्राम्हणी : जागतिक पर्यावरण दिनानिमित आदिशक्ती संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनादरम्यान ब्राह्मणी ॲग्रोमाईंड शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत पर्यावरण संवर्धनासाठी दोन हजार रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.रोपे घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
सिसम, बेल, शेवगा,काशीद,लिंब आदीसह विविध झाडांच्या रोपांचा समावेश होता. यावेळी अध्यक्ष एकनाथ वने ,सचिव बाबासाहेब वने,संचालक आबासाहेब वने,योगेश राजदेव,गौरव वने, सोमनाथ तारडे ,आनंद ढोकणे,अक्षय वने आदी उपस्थित होते.
पाऊस पडल्याने लावण्यात आलेली रोपे आता निश्चिती येतील.आदिशक्तीच्या दरबारात रोपे वाटप करून वृक्ष संवर्धन चळवळीसाठी काम केल्याच समाधान आहे.असे मत ब्राह्मणी ॲग्रोमाईंड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष एकनाथ भाऊ वने यांनी व्यक्त केले.