ब्राम्हणी : राहुरी मार्केट कमिटीचे संचालक,व्यापारी,कर्मचारी यांनी मिळून मार्केटचे मयत कर्मचारी प्रवीण देशमुख यांच्या कुटुंबीयास मंगळवारी 1 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. जिल्हा सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक व राहुरी मार्केट कमिटीचे सभापती अरुणराव तनपुरे यांनी यांनी स्वतः देशमुख कुटुंबाकडे सदर रक्कम सुपूर्त केली.पुढे भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात मदत दिली जाणार असल्याची माहिती सभापती तनपुरे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
आज बुधवारी सकाळी राहुरी बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांनी गणराज्य कार्यालयास् सदिच्छा भेट देवून तालुक्यातील शेतकऱ्यांविषयी विविध प्रश्नावर चर्चा केली. बाजार समितीला माल विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता संदेश सुविधा सुरू करण्यात येत आहे. राहुरी मार्केट कमिटीच्या माध्यमातून राहुरी शहर व वांबोरी परिसरात नवीन पेट्रोल पंप नियोजित आहे. वांबोरी उपबाजारात पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
मार्केट कमिटी कडून नवीन जागेचा शोध घेवून स्वतंत्र फ्रुट मार्केट, व जनावरांचा बाजार नियोजित आहे. मार्केटमध्ये माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवण (कॅन्टीन) सुरू करण्याचा विचार असल्याचे सभापती तनपुरे यांनी सांगितले. गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे यांनी बाजार समिती व शेतकऱ्यांच्या हिताबाबत विचारलेल्या अनेक प्रश्नांना सभापती अरुणराव तनपुरे यांनी सविस्तर व अभ्यासपूर्वक उत्तरे देत मनमोकळा संवाद साधला. एक तासाच्या चर्चेदरम्यान शेतकरी धोरणासंबंधी बहुतांश चर्चा केली.
यावेळी मार्केट कमिटीची माजी संचालक रंगनाथ मोकाटे,महेंद्र तांबे, माणिक तारडे, गणपत जाधव,बाळासाहेब शेळके, दादासाहेब खोसे, दीपक हापसे, दत्तात्रय तारडे,अशोक देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. गणराज्य न्यूजचे संपादक यांनी सर्वाचे स्वागत करत सभापती तनपुरे यांचा सन्मान केला.