नगर : जागतिक योगा दिनानिमित्त उद्या शुक्रवार 21 जून रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित योगा करावा.लगेच शाळा भराव्यात.दुपारी 1.30 वाजेपर्यंत शाळा भरावी.अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांनी दिल्या आहेत.
बहुतांश शिक्षक मुख्यालयी राहतात.असा अहवाल आहे त्यानुसार प्रत्येकाने वेळेत शाळेत येवून सकाळी 7.30 वाजता उपस्थित राहून योगा करावा.फोटो , व्हिडीओ शेयर करावेत. अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या.त्यानुसार सर्व शाळांना सकाळीच योगा करणे आता सक्तीचे आहे.असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी केले आहे.
सकाळी शाळेत योगा होतो की नाही.याबाबत पालक व ग्रामस्थांनी सतर्क रहावे.सकाळी 7.30 वाजता आपल्या गावातील , परिसरातील शाळेत योगा न झाल्यास गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.असे आवाहन करण्यात येत आहे.
योग दिवस वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने महिला शिक्षकांचा विचार करून दिवसभर पूर्ण वेळ शाळा भरण्याऐवजी दुपारी दीड पर्यंत शाळा भरण्याचा विचार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. वटपोर्णिमा नसती तर पूर्ण दिवस शाळा भरण्याचा विचार झेडपीचा होता. केवळ वटपौर्णिमेचा विचार करून बदल करण्यात आला आहे.अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.