गणराज्य न्यूज नगर : जिल्ह्यामध्ये पुढील २ ते ३ दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासांत काही ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गहू
सततच्या ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याकरिता हवामान कोरडे असताना १ ग्रॅम थायोमिथोक्झाम २५ WG प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
हरबरा
सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरबरा पिकामध्ये घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याकरिता हवामान कोरडे असताना ५% निबोळी अर्क किंवा हेलिओकील ५०० मिली (एक हेक्टरी) प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारावे.
जर अळी मोठी असल्यास ४ ग्रॅम इमामेक्टीन बेझोएट ५% प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
सदरील फवारणी नंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ ची फवारणी करावी (१०० मिली/ १० लिटर पाणी)
कांदा
कांदा पिकामध्ये ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याकरिता लंम्डासायहँलोथ्रीन ५ EC ६ मिली + टेब्यूकोनँझोल १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.असे आवाहन राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले आहे.