Home अहमदनगर विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांचा हातात-हात

विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांचा हातात-हात

35
0

 

ब्राम्हणी : ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून गावातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुमारे 15 लाख रु. किमतीच्या भूमिगत गटार कामाचे भूमिपूजन मंगळवार 1 ऑटो रोजी पार पडले.

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्राध्यापिका सौ. सुवर्णाताई सुरेशराव बानकर, उपसरपंच भानूआप्पा मोकाटे, सोसायटीचे चेअरमन,सदस्य महेंद्र तांबे, माजी उपसरपंच गणेश तारडे,सदस्य शांताराम हापसे, ग्राम विकास अधिकारी माणिकराव घाडगे, ठेकेदार बाळासाहेब शिंदेसह प्रभाग तीन क्रमांकधील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनेक दिवसापासून भूमिगत गटारची प्रतीक्षा होते. पावसाळ्यातील पाणी व नियमित सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याने रहिवाशांना दुर्गंधी व आरोग्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. आता भूमीगत गटार होणार असल्याने सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत.

वर्षभरात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लावली जात आहेत. विकास कामाबाबत सत्ताधारी व विरोधकांमधील समन्वय गावाच्या फायद्याचा ठरत असल्याचे काही चर्चा व कामाच्या बाबतीतून दिसून येत आहे. ब्राह्मणी गावच्या इतिहासात समन्वय साधत आपलं कर्तव्य बजविनारी सध्याची सदस्य बॉडी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here